

Security Alert After Bomb Threat Email to Ahilyanagar Collectorate
Sakal
अहिल्यानगर : जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी गुरुवारी (ता.१८) सकाळी ई-मेलद्वारे देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाने तत्काळ नागरिक आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले. पोलिस प्रशासनाने केलेल्या सखोल तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज आता पूर्णपणे सुरळीत सुरू झाले आहे.