पारनेर: सध्या अहिल्यानगर शहरातील पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा आरोप खासदार नीलेश लंके यांनी केला आहे. राजकीय दबावामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गडद सावट पसरले असून, नागरिकांमध्ये पोलिस यंत्रणेवरील विश्वास डळमळीत झाल्याचे दिसून येत असल्याचे लंके यांनी पोलिस प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.