
Jamkhed police seize ₹6.5 lakh and a local pistol in connection with art center burglary; seven arrested, 11 still on the run.
Sakal
अहिल्यानगर: जामखेड येथील कलाकेंद्राची तोडफोड करुन दहशत निर्माण करणाऱ्या सात आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसांसह साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आणखी ११ आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.