esakal | Good News : दोन महिन्यांत मिळणार मुबलक अॉक्सीजन

बोलून बातमी शोधा

oxygen machines
Good News : दोन महिन्यांत मिळणार मुबलक अॉक्सीजन!
sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड : ऑक्‍सिजनच्या तुटवड्याने हैराण झालेल्या नगर (nagar) जिल्ह्याला दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात आता नव्याने सात जम्बो ऑक्‍सिजन प्लॅंट (oxygen machines) उभे राहणार आहेत. याकरिता कार्यारंभ आदेशही निघाले आहेत. अवघ्या पंचेचाळीस दिवसांत हे प्रकल्प पूर्ण करण्याचे संबंधित एजन्सींना बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ऑक्‍सिजन प्लॅंटसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (rajendra bhosle) प्रयत्नशील आहेत. त्यामुळे दोन महिन्यांत जिल्ह्यात मुबलक ऑक्‍सिजन उपलब्ध होणार आहे.(Seven oxygen plants will be set up in Nagar district)

हेही वाचा: बंगालमध्ये विधान परिषद का नाही, दीदी कशा होणार मुख्यमंत्री?

जिल्ह्यात पूर्वी पाच ऑक्‍सिजन प्लॅंट सुरू होते. नव्याने संगमनेर व कोपरगावमधील साखर कारखाने, तसेच विळद घाटात खासदार डॉ. सुजय विखेंच्या पुढाकाराने ऑक्‍सिजन प्लॅंट उभे राहत आहेत. साईसंस्थानच्या माध्यमातून ऑक्‍सिजन प्लॅंट सुरू आहे. त्यातच नव्याने शासकीय स्तरावरून सात ऑक्‍सिजन प्लॅंटचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये पॅंराडे एजन्सीला कर्जत, पाथर्डी व संगमनेर येथे, ऑक्‍सर एजन्सीला नगर, श्रीगोंदे, तर फायरवेल एजन्सीला श्रीरामपूर, अकोले येथे प्लॅंटसाठी परवानगी मिळाली आहे.

हे प्रकल्प 50 बाय 50, अशा 2500 हजार चौरस फूट जागेवर साकारले जाणार आहेत. याकरिता जागांची निश्‍चिती झाल्याचे समजते. एक प्रकल्प उभारण्यासाठी सरासरी सव्वादोन कोटी, असा एकूण पंधरा कोटी पंचाहत्तर लाख रुपये खर्च येणार आहे. पंचेचाळीस दिवसात शेड व इतर कामे पूर्ण केली जाणार आहेत.

प्लॅंटसाठी लागणारे काही सुटे भाग परदेशातून आणले जाणार आहेत. प्रत्यक्षात जूनपासून जिल्ह्यातील नागरिकांना या प्रकल्पातून प्रतिदिन सात हजार लिटर क्षमतेचे ऑक्‍सिजनचे अडीचशे जम्बो सिलिंडर मिळणार आहेत. प्लॅंट सुरू झाल्यापासून वर्षभरापर्यंत देखभाल- दुरुस्तीचे काम संबंधित एजन्सीकडेच असणार आहे. नंतर वार्षिक देखभालीची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडून निश्‍चित केली जाणार आहे.

हेही वाचा: आता पुढची विकेट काँग्रेस मंत्र्याची, सुजय विखे पाटलांच्या विधानाने खळबळ

राज्यात ऑक्‍सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सहकारी साखर कारखानदारांना ऑक्‍सिजन प्लॅंट उभे करण्याची साद घातली, तर त्यांचे नातू आमदार रोहित पवारांनी आजोबांच्या पावलावर पाऊल टाकीत जिल्हा प्रशासनाला ऑक्‍सिजन प्रकल्प उभारणीचा निर्णय घ्यायला लावून गळ घातली. त्यामुळे नगर जिल्ह्यात दोन महिन्यांनंतर मुबलक प्रमाणात ऑक्‍सिजन उपलब्ध होईल, हे मात्र नक्की!

कर्जत-पाथर्डी, संगमनेरची अडचण सुटली

"कर्जत, पाथर्डी व संगमनेर येथील जागेची अडचण सुटली आहे. सिव्हिल वर्क उद्यापासून (बुधवार) सुरू करीत आहोत. पंचेचाळीस दिवसांत प्लॅंटचे काम पूर्ण करणार आहोत. जूनपासून ऑक्‍सिजन प्लॅंट सुरू होतील.

- डॉ. तिरुपती ताटेवार, तांत्रिक अधिकारी, पॅंराडे एजन्सी, कोइमतूर

(Seven oxygen plants will be set up in Nagar district)