
“‘Shanaishvar’ donation fund successfully audited with legal trustee supervision and religious department oversight.”
Sakal
सोनई : शनैश्वर देवस्थानसाठी नव्याने स्थापन कार्यकारी समितीने दानपात्राची मोजदाद केल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिलेला असताना आज व्यवस्थापक राजेंद्र वाकचौरे व धर्मदाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक उमेश जाधव यांच्या देखरेखीत दानपात्राची मोजदाद करण्यात आली. राज्य शासनाकडून बरखास्त केलेल्या विश्वस्तांची आज जनसंपर्क कार्यालयात पुढील व्यूहरचनेसाठी बैठक झाली.