
Atul Choramare takes charge as CEO as Shanaishwar forms its executive committee.
Sakal
सोनई : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे प्रशासक म्हणून पदभार घेतल्यानंतर आज येथील दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी कार्यकारी समितीची निवड जाहीर केली आहे. उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. आज समितीमधील पाच सदस्यांनी मंदिर परिसरास भेट देऊन सर्व विभागांचे कामकाज पाहून घेतले.