
Shanaishwar temple trustees hold a meeting at the PR office to discuss management challenges while staff remain in dilemma over administrative decisions.
Sakal
सोनई : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शनिवारी (ता.४) रोजी ‘आज आहे ती स्थिती’र ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर आज शनिशिंगणापूर येथे बरखास्त केलेल्या विश्वस्त मंडळाने ‘आम्हीच खरे कारभारी आहोत,’ असे समजून देवस्थान जनसंपर्क कार्यालयात विश्वस्तांची व नंतर विभाग प्रमुखांची बैठक घेतली. दुसरीकडे जिल्हाधिकारी नियुक्त कार्यकारी समितीने आज सुटीचा वार असताना प्रशासकीय कार्यालयात येऊन कामकाज पाहिले आहे. न्यायदेवता असलेल्या शनिदेवाच्या दरबारात उच्च न्यायालयाने आम्हालाच न्याय दिल्याचे दोन्ही बाजूने सांगण्यात येत असल्याने ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांत द्विधा मनस्थिती झाली आहे.