
Staff and administrative operations face challenges in Shanaiwar as salaries are delayed and essential purchases are stalled.
Sakal
सोनई : कडी-कुलूपांचा वापर होत नसलेल्या मुलखावेगळ्या शनिशिंगणापूर गावात शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या संपूर्ण प्रशासकीय कार्यालयास लावण्यात आलेले सील राज्यात आणि देशात चर्चेत आले आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लावण्यात आलेले सील कायम असल्याने कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस आणि पगार अडचणीत सापडले आहेत. बरखास्त केलेले विश्वस्त व नव्याने कारभार पहात असलेल्या कार्यकारी समिती कुठलाच निर्णय घेत नसल्याने देवस्थानला आवश्यक असलेले साहित्य आणायचे कसे, असाही प्रश्न उभा राहिला.