
Devotees performing abhishek rituals at Shaneshwar temple; official receipt system introduced.
Sakal
सोनई : शनैश्वर देवस्थान ट्रस्टने मंदिरात असलेल्या पुरोहितांची मानधनावर नेमणूक केल्यानंतर पहिल्याच दिवशी परवा शनिवारी (ता.६) रोजी ३४७ भक्तांनी शंभर रुपयांची रितसर पावती घेऊन अभिषेक केला. या योजनेतून ट्रस्टला पहिल्या दिवशी चौतीस हजार ७०० रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. तीन दिवसांत ४३० भक्तांनी अभिषेक केला.