
सोनई : सहाव्या वेतन आयोगातील प्रलंबित आठ प्रमुख मागण्या मंजूर करण्याच्या मागणीसाठी आज (ता.४) दुपारी बारा वाजता शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानचे कर्मचारी साखळी उपोषणास बसले आहेत. भाविकांची गैरसोय होवू नये याकरिता शंभराहून अधिक कामगार साखळी उपोषणास, तर पाच कामगार आमरण उपोषणास बसले आहेत.