
सोनई : ऑनलाइन शनिदेवाची पूजेतील अॅप घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आज अहिल्यानगर येथील सायबर शाखेचे पथक व शनिशिंगणापूर पोलिसांनी देवस्थान परिसराची पाहणी करून स्थळ पंचनामा केला. सलग चार तास चाललेल्या पंचनामा भेटीमुळे ग्रामस्थ व परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आलेले आहे.