Shani Shingnapur Temple: 'शनैश्वर देवस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी पगाराविना'; न्यायालयाचे आदेश 'जैसे थे', कर्मचाऱ्यांवरच साडेसातीचा फेरा

Legal Deadlock Hits Shani Shingnapur Temple: युको बँकेने औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या 'आहे ती स्थिती ठेवावी' या आदेशाचे पालन म्हणून खात्यात रक्कम भरण्यास व काढण्यास विरोध केला आहे. बँकेच्या कायदेशीर निर्णयाने दस्तुरखुद्द शनिदेवाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांवरच साडेसातीचा फेरा पडला आहे.
Shani Shingnapur temple workers express anguish over unpaid salaries; court’s ‘status quo’ order halts payment.

Shani Shingnapur temple workers express anguish over unpaid salaries; court’s ‘status quo’ order halts payment.

sakal

Updated on

सोनई : 'बिन पगारी अन् फुल अधिकारी' अशी एक म्हण मराठीत प्रचलित असून अगदी याप्रमाणेच सध्या मुलखावेगळ्या शनिशिंगणापूर गावाची व तेथील शनैश्वर देवस्थान कारभाराची अवस्था झाली आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर नव्याने कारभार पहात असलेल्या कार्यकारी समितीने कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व पगार देण्याची तयारी केली खरी मात्र गावातील युको बँकेने औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या 'आहे ती स्थिती ठेवावी' या आदेशाचे पालन म्हणून खात्यात रक्कम भरण्यास व काढण्यास विरोध केला आहे. बँकेच्या कायदेशीर निर्णयाने दस्तुरखुद्द शनिदेवाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांवरच साडेसातीचा फेरा पडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com