
Sharad Pawar inaugurates Rayat Shikshan Sanstha’s new building in Kedgaon; announces AI education in all schools.
Sakal
नगर तालुका: शेती, आरोग्य, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास उत्पादकता वाढते. भविष्यकालीन विचार करता रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाळेत कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञान देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. संस्थेचे सर्व शिक्षक हा उपक्रम यशस्वी करतील, असा विश्वास माजी केंद्रीय कृषिमंत्री व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.