

Robbers tie a couple in Shegaon and assault them with an iron rod before looting valuables worth lakhs.
Sakal
शेवगाव : चोरट्यांनी दोन वस्त्यांवर पती-पत्नीला दोरखंडाने बांधून लोखंडी रॉड, लाथाबुक्क्याने मारहाण करत चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा दोन लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना देवटाकळी (ता. शेवगाव) येथे मंगळवारी (ता.२५) रात्री मगरवस्तीवर घडली. याप्रकरणी हरिभाऊ बाजीराव ओंबळे यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.