esakal | अवैध मुरुम वाहतुक प्रकरणी ठेकेदारास दंड; महसूल पथकाची कारवाई

बोलून बातमी शोधा

In Shevgaon the contractor has been fined and action has been taken in the case of illegal pimple transportation}

मोठया प्रमाणात मुरुम वाहतुक सुरु असताना अवघ्या २० ब्रासला १ लाख ५० हजार रुपयांचा दंड करुन महसूल पथकाने कारवाई मागील गौडबंगाल वाढवले आहे. 

अवैध मुरुम वाहतुक प्रकरणी ठेकेदारास दंड; महसूल पथकाची कारवाई
sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : जायकवाडी धरणावरुन गेवराई (जि. बीड) येथे पाणी पुरवठा करण्यासाठी टाकण्यात येणा-या जलवाहिनीच्या व टाकीच्या भरावासाठी टाकण्यात येणा-या मुरुमाच्या अवैध वाहतुक प्रकरणी संबंधित ठेकेदारास महसूल विभागाने दंड करुन कारवाई केली आहे. मात्र मोठया प्रमाणात मुरुम वाहतुक सुरु असताना अवघ्या २० ब्रासला १ लाख ५० हजार रुपयांचा दंड करुन महसूल पथकाने कारवाई मागील गौडबंगाल वाढवले आहे. 

जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह तुटला; 24 गावांना पाणी फटका

जायकवाडी धरणातून गेवराईला पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनीचे काम सुरु आहे. तालुक्यातून जाणा-या या जलवाहिनीसाठी गेवराई रस्त्यावरील बालमटाकळी परिसरात पाण्याच्या साठवण टाकीचे बांधकाम अजय कृष्णराव पाटील या ठेकेदारामार्फत सुरु आहे. टाकीच्या पायासाठी खोदलेल्या भरावात टाकण्यासाठी सुकळी शिवारातील जनाबाई दत्तात्रय भवर यांच्या नवीन विहीरीच्या कामावरुन मुरुम वाहतुक सुरु होती.

तहसिलदार अर्चना भाकड यांना मिळालेल्या माहितीनुसार नायब तहसिलदार विकास जोशी, सचिन लोहकरे, बी.आर.खुडे, तलाठी बाबासाहेब अंधारे, अमर सेंडे, किशोर पवार यांच्या पथकाने  रविवार (ता.७) रोजी रात्री तेथे धाड टाकली. मात्र मुरुम वाहतुक करणारी वाहने पसार झाली. तर विहीरीच्या खोदकामासाठी वापरण्यात येणारे पोकलेंन्ड मात्र पथकाच्या तावडीत सापडले. त्याच्या चालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार हा मुरूम जलवाहिनीच्या कामासाठी नेला जात असल्याची माहिती मिळाली. पथकाने टाकीच्या कामाच्या ठिकाणी समक्ष पाहणी करुन अवैध मुरुम वाहतुक प्रकरणी संबंधित ठेकेदार पाटील यांच्यावर २० ब्राससाठी १ लाख ५० हजार रुपये दंड आकारण्यात आला.

उद्योजक हिरण हत्येच्या निषेधार्थ अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय; तिसऱ्या दिवशीही बेलापूर बंद
 
मात्र रविवारी रात्री झालेल्या नाटयमय घडामोडीत संबंधित ठेकेदाराने राजकीय वजन वापरुन किरकोळ स्वरुपात दंड आकारण्यास महसुल पथकास भाग पाडल्याची चर्चा आहे. महसुल विभागाकडून अवैध वाळू, मुरुम, डांबर, खडी करणा-या ट्रँक्टर, डंपर, जेसीबी अशा वाहनांवर लाखो रुपयांचा दंड केला जातो. त्यामध्ये ग्रामिण भागातील विहीरीची, शेततळ्याच्या कामातील शेतक-यांच्या वाहनांचाही समावेश असतो.

अशा वाहनांवर तात्काळ कारवाई करत लाखोंचा दंड आकारणारे महसुल प्रशासन मात्र कालच्या कारवाईत ठेकेदारापुढे आणि राजकीय हस्तक्षेपापुढे नमल्याने मुरुम वाहतुक करणारे एकही वाहन त्यांना सापडू शकले नाही. यामागील गौडबंगालाची चर्चा नागरीकांत सुरु आहे.