
Gas cylinder blast in Shevgaon city injures two; building windows shattered.
Sakal
शेवगाव: शहरातील पंचायत समिती रस्त्यावरील शिववंदना इमारतीत आज सकाळी साडेआठच्या दरम्यान एका गॅस टाकीचा मोठा स्फोट होऊन त्यात दोन जण जखमी झाले. इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या व भिंतींना तडे गेले, तर एका दुकानाचे शटर वीस फुटांवर जाऊन पडले.