Shevgaon Panchayat Samiti:'शेवगाव पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण'; सर्व पक्षांतील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना मिळणार बळ

Divisions Reserved : शेवगाव येथील तहसील कार्यालयात आज सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार आकाश दहाडदे, नायब तहसीलदार राजेंद्र बकरे, मंडलाधिकारी श्रीनिवास आव्हाड, सुरेश बर्डे यांच्या उपस्थितीत गणनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली.
Second-line party workers gain strength as Shevgaon Panchayat Samiti divisions are reserved.

Second-line party workers gain strength as Shevgaon Panchayat Samiti divisions are reserved.

Sakal

Updated on

-सचिन सातपुते

शेवगाव: शेवगाव पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण सोडत आज (ता.१३) जाहीर करण्यात आली. तालुक्यातील एकूण ८ गणांपैकी दहिगावने, मुंगी व बोधेगाव-सर्वसाधारण महिला, घोटण व लाडजळगाव - सर्वसाधारण, भातकुडगाव-अनुसूचित जाती व्यक्ती, अमरापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, तर खरडगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आला. यामुळे भाजप व राष्ट्रवादी या दोन पक्षांतील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना पंचायत समितीमध्ये पाऊल ठेवण्याची संधी मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com