

“Shevgaon’s water supply project fails trial — citizens protest, all-party committee demands immediate action.”
Sakal
शेवगाव : पाण्यासाठी अनेक वर्षांपासून वाट पाहत असलेल्या नवीन पाणी योजनेची घेण्यात आलेली प्रायोगिक चाचणी समाधानकारक पार न पडल्याने योजनेवरील शासनाचा पैसा पाण्यात जाऊ शकतो, अशी भीती व पुन्हा पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ शेवगावकरांच्या नशिबी येऊ नये म्हणून संबंधित प्रशासकीय यंत्रणेने वेळीच यात लक्ष घालण्याची मागणी सर्व पक्षीय पाणीपुरवठा समितीतर्फे करण्यात आली.