
श्रीरामपूर : शहरातील व्यापाऱ्यांच्या घामाच्या पैशावर एकाच झटक्यात केलेली नगरपरिषदेच्या गाळ्यांच्या ७५ टक्के भाडेवाढ अन्यायकारक असल्याने ती तत्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी आज (ता. २१) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना निवेदन सादर केले. निवेदन गाळेधारक व शिवसेना शिंदे गटातर्फे देण्यात आले.