शिर्डीचे उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांचा राजीनामा

सतीश वैजापूरकर
Tuesday, 15 December 2020

नव्या उपनगराध्यक्षांच्या निवडीसाठी नगरपंचायत वर्तुळात पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संमतीनेच सर्वानुमते नव्या उपनगराध्यक्षांची निवड होण्याची शक्‍यता आहे.

शिर्डी ः येथील उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभूवन यांनी नूतन नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपविला. नगराध्यक्ष गोंदकर यांनी राजीनामा मंजूर करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.

नव्या उपनगराध्यक्षांच्या निवडीसाठी नगरपंचायत वर्तुळात पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संमतीनेच सर्वानुमते नव्या उपनगराध्यक्षांची निवड होण्याची शक्‍यता आहे. 

मावळते उपनगराध्यक्ष त्रिभूवन म्हणाले, की विखे पाटील यांच्या सुचनेनुसार पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यामुळे दुसऱ्यांदा हे पद भूषविण्याची संधी मिळाली. या वेळी दीड वर्षाचा कार्यकाल मिळाला. आपण समाधानी आहोत. 

हेही वाचा ः कोपरगावच्या शेतकऱ्याने लावली एकदाच फळबाग, आता पैसाच पैसा

दरम्यान, उपनगराध्यक्ष पदासाठी हरिश्‍चंद्र कोते व दत्तात्रेय कोते यांची नावे चर्चेत आहेत. अशोक गोंदकर व पोपट शिंदे हेदेखील या पदासाठी उत्सुक असल्याचे समजते. तथापी, अंतिम निर्णय आमदार विखे पाटील वा खासदार डॉ. सुजय विखे पाटील हेच घेतील.

नगरपंचायत निवडणूक तोंडावर आल्याने, नव्या उपनगराध्यक्षांना केवळ आठ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. जिल्हाधिकारी लवकरच या निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. त्यानंतर सदस्यांतून सर्वानुमते किंवा निवडणूक घेऊन नव्या उपनगराध्यक्षांची निवड केली जाईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirdi Deputy Mayor Mangesh Tribhuvan resigns