शिर्डी : अकरा ‘साईरत्नां’चा शिर्डीत गौरव

मनोजकुमार, महाडीक, शेर्वेकर, बालमभाईंचा समावेश
शिर्डी : अकरा ‘साईरत्नां’चा शिर्डीत गौरव

शिर्डी : शिर्डी के साईबाबा या चित्रपटाद्वारे शिर्डीची कीर्ती देश-विदेशांत पोचविणारे अभिनेते मनोजकुमार, साईचरित्र ग्रंथातील चित्रे रेखाटणारे विलास महाडीक, झांजपथकाद्वारे साईसेवा करणारे गजानन शेर्वेकर, ताशा वाजविणारे बालमभाई, सेवाभावी डॉ. राम नाईक अशा, शिर्डीची महती वाढविण्याचे कार्य करणाऱ्या अकरा महानुभावांना यंदा ग्रामस्थांच्या वतीने साईरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कला पेश करण्यासाठी आलेल्या कलाकारांचा साईबाबा चांदीचा रुपया देऊन सन्मान करीत. या परंपरेचा आधार घेत ग्रामस्थांनी या श्री रामनवमी यात्रेपासून शिर्डीची महती वाढविणाऱ्या महानुभावांचा साईंची चांदीची मुद्रा व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्याचा उपक्रम सुरू केला. मुंबईहून येणाऱ्या साईसेवक पालखीचे अध्यक्ष नामदेव मलिक, पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, स्वच्छता कर्मचारी बाळासाहेब सोनावणे, साईभक्त गजराज दळवे, अनिलभाई सिसोदिया, साईलीला पालखीचे अध्यक्ष श्रावणबाळ इंगळे आदींचा साईरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यात्रा समितीचे अध्यक्ष कमलाकर कोते, माजी सरपंच मुकुंदराव कोते, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, बाबासाहेब कोते, जगन्नाथ गोंदकर, ताराचंद कोते, नीलेश कोते, किशोर बोरावके, दिगंबर कोते आदींच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. राहुल गोंदकर, मंगेश त्रिभुवन, दीपक वारुळे, सुनील परदेशी, ज्ञानेश्वर गोंदकर आदींनी परिश्रम घेतले.

शिर्डीचा नावलौकिक वाढविण्याचे कार्य करणाऱ्या अकरा व्यक्तींना दर वर्षी साईरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा उपक्रम ग्रामस्थांच्या वतीने यंदापासून सुरू करण्यात आला आहे. साईपालखीची परंपरा सुरू करणाऱ्या साईभक्त पालखी पदाधिकाऱ्यांपासून ते सफाई कामगारांपर्यंत विविध घटकांतील सेवाभावी व्यक्तींना यंदा सन्मानित करण्यात आले.

- कमलाकर कोते, अध्यक्ष, यात्रा समिती

साईबाबांच्या शिर्डीची जडणघडण करण्यात शेकडो सेवाभावी व्यक्तींचा हातभार लागला आहे. अभिनेता मनोजकुमार, दानशूर साईभक्त के. व्ही. रमणी, शिर्डी के साईबाबा चित्रपटाची निर्मिती करणारे पांडुरंग दीक्षित, साईभक्त डॉ. सत्पथी गुरुजी यांच्यापासून ते साईसंस्थानचे माजी विश्वस्त शांताराम मिराणे यांच्यापर्यंत अनेक नावे सांगता येतील. या सर्वांचे आम्ही शिर्डीकर ऋणी आहोत.

- कैलास कोते, माजी नगराध्यक्ष, शिर्डी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com