

Shirdi guests enjoy Kashmiri wedding traditions; cultural warmth and heartfelt hospitality steal the show
Sakal
-सतीश वैजापूरकर
शिर्डी : काश्मीर खोऱ्यातील पर्यटक मित्र एजाज शाह यांनी दिलेल्या विवाह सोहळ्याच्या निमंत्रणाला मान देऊन येथील डाॅ. एम. वाय. देशमुख व त्यांच्या दोन डाॅक्टर मित्रांनी सपत्नीक हजेरी लावली. तीन दिवस चाललेल्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या सर्वांनी शाह यांच्या घरी मुक्काम केला, सोहळ्यानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला.