शिर्डी-मुंबई-पंढरपूर रेल्वे गाड्या पुन्हा सुरू कराव्यात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

शिर्डीतील साई मंदीर,कार्तीक स्वामी आणि पुणतांबेतील चांगदेव महाराज मंदीर दर्शनासाठी खुले झाले आहे. या दोन तीर्थक्षेत्रावर भाविकांची वर्दळ वाढली आहे.

पुणतांबे : कोरोनाच्या काळात बंद ठेवलेल्या साईनगर-दादर आणि शिर्डी-पंढरपूर या दोन गाड्या रेल्वेप्रशासनाने पुन्हा कराव्यात अशी मागणी पुणतांबे रेल्वे प्रवाशी संघाने केली आहे. 

शिर्डीतील साई मंदीर,कार्तीक स्वामी आणि पुणतांबेतील चांगदेव महाराज मंदीर दर्शनासाठी खुले झाले आहे. या दोन तीर्थक्षेत्रावर भाविकांची वर्दळ वाढली आहे. परंतू रेल्वे सेवा बंद असल्याने भाविकांचे हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाने या दोन रेल्वे गाड्या सुरु कराव्यात अशी मागणी प्रवाशी संघाने केली आहे. 

हेही वाचा - आली आली कोरोना लस आली

दौंड-मनमाड रेल्वे लाईनवर पुणतांबे जंग्शन रेल्वे स्थानक आहे. या मार्गावरुन अनेक एक्‍स्प्रेस रेल्वे धावतात, परंतू त्यांना येथे थांबा नाही. साईभक्तांनसाठी साईनगर ते दादर, शिर्डी ते पंढरपुर या रेल्वे गाड्या आहेत.

कोरोना महामारीपासून या दोन्ही गाड्या बंद आहेत. त्या सुरु कराव्यात यासाठी प्रवाशी संघटना ऊपाध्यक्ष विलास बोर्डे. संतोष चोरडीया, संजय जोगदंड आदीनी रेल्वे प्रशानानकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा सुरु केला आहे, मात्र अद्याप या दोन्ही गाड्या सुरु झाल्या नाहीत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirdi-Mumbai-Pandharpur trains should be restarted