
-सतीश वैजापूरकर
शिर्डी : शिर्डी नगरपरिषदेने सौरऊर्जा निर्मितीत जिल्ह्यात आघाडी घेतली. पालिकेच्या मालकीच्या अकरा इमारतींच्या छतांसह घनकचरा प्रक्रिया व पाणीसाठवण योजनेच्या तलाव परिसरात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पाद्वारे दरमहा एक लाखाहून अधिक युनिट वीजनिर्मिती केली जाते. उन्हाळ्यातील अधिकची सौरऊर्जा निमिर्ती लक्षात घेतली, तर दरमहा सरासरी दहा ते पंधरा लाख रुपयांची वीजबिल बचत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जानिर्मिती करणारी जिल्ह्यातील ही एकमेव नगरपालिका ठरावी.