
शिर्डी : साईदर्शनासाठी शिर्डीत आल्यानंतर विविध ठिकाणांहून गहाळ झालेले सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे तीस मोबाईल पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी मूळ मालकांना परत मिळवून दिले. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारने सुरू केलेल्या www.ceir.gov.in या वेबसाईचा वापर केला.