

Fake Godman’s Loan Trap? Ashok Kharat Arrested in Land Grab Case
sakal
शिर्डी: महिला अत्याचार प्रकरणात अटक असलेला भोंदूबाबा अशोक खरात याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. खरात व त्याची पत्नी कल्पना हिने दोन टक्के व्याजाने पैसे देऊन एका शेतकऱ्याची चार एकर जमीन लाटल्याचा प्रकार शिर्डी येथे समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी खरात याच्यासह त्याची पत्नी व अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.