

Minister Radhakrishna Vikhe Patil during a meeting with workers in Shirdi; announcement of Spiritual Corridor project.
Sakal
शिर्डी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशातील सर्वच आध्यात्मिक नगरांचे स्वरूप बदलत आहे. त्याच धर्तीवर शिर्डीचे रूपांतर आध्यात्मिक कॉरिडाॅरमध्ये करावे लागेल. त्यासाठी शहरवासीयांना सोबत घेऊन आपण पुढाकार घेणार आहोत. राज्य सरकारच्या मदतीने विविध विकास प्रकल्प उभारून येथील आध्यात्मिक पर्यटन वाढविण्यास प्राधान्य देणार आहोत, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.