
श्रीरामपूर : हरेगाव-शिरसगाव परिसरात गेल्या दोन-तीन वर्षांपासून दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या सापळ्यात अडकला. सोमवारी (ता.३०) रात्री ११.३० ते १२ च्या सुमारास कुत्र्याचे आमिष दाखवून लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. या कारवाईमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.