.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अहिल्यानगर : राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात २०२० मध्ये सुरू केलेल्या शिवभोजन योजनेच्या अनुदानात पाच वर्षांत कोणतीही वाढ झालेली नाही. अनेक महिने बिल मिळत नसल्याने ही योजना चालविणे शिवभोजन चालकांना परवडत नाही. जिल्ह्यातील सात केंद्र चालकांनी शिवभोजन केंद्र बंद केले आहेत. आता जिल्ह्यात अवघे ३९ केंद्र राहिले असून, त्या माध्यमातून ४ हजार ५२५ थाळ्यांचे वितरण होत आहे.