जिल्ह्यात तीनशे अॉक्सीजन बेडची शिवसेनेची मागणी

Shiv Sena demands 300 oxygen beds in the district
Shiv Sena demands 300 oxygen beds in the district

नगर : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हा रुग्णालयात ऑक्‍सिजनयुक्त वाढीव तीनशे बेडची उपलब्धता अतिशय गरजेची असून, ती तातडीने करावी, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केली आहे. यासाठी शिवसेनेकडून शासनदरबारी सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा यांच्याशी याबाबत चर्चा केली. नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर अभिषेक कळमकर, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, आनंद लहामगे, नगरसेवक दत्ता जाधव, नगरसेवक श्‍याम नळकांडे, विजय पठारे उपस्थित होते.

शिष्टमंडळाने डॉ. पोखर्णा यांच्याशी हॉस्पिटलमधील बेडची उपलब्धता, कोरोना रुग्णांना मिळणाऱ्या सेवा-सुविधा, यंत्रसामग्री, भविष्यात हवी असलेली अत्याधुनिक यंत्रसामग्री, येणाऱ्या अडचणी, रुग्णांच्या नातेवाइकांच्या तक्रारी आदी बाबींची चर्चा केली. डॉ. पोखर्णा म्हणाले, की कोरोना रुग्णांवर येथे योग्य उपचार उपलब्ध यंत्रसामग्रीद्वारे केले जात असून, काही विषयांच्या अपुऱ्या माहितीमुळे हॉस्पिटलबाबत गैरसमज होत आहेत. 

संपादन - अशोक निंबाळकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com