संगमनेरातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाघाची डरकाळी

सतीश वैजापूरकर
Monday, 21 December 2020

संगमनेर, अकोले व शिर्डी विधानसभा मतदार संघात तालुक्‍यातील गावांचे विभाजन झालेल्या 94 ग्रामपंचायतीच्या निवडणूकांची धामधुम सुरु झाली. शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते अंग झाडून सज्ज झाले आहेत.

संगमनेर ः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच तालुक्‍यात 94 ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा बिगुल वाजला. या पार्श्वभूमीवर आज दुपारी संगमनेरात खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. 

संगमनेर, अकोले व शिर्डी विधानसभा मतदार संघात तालुक्‍यातील गावांचे विभाजन झालेल्या 94 ग्रामपंचायतीच्या निवडणूकांची धामधुम सुरु झाली. शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते अंग झाडून सज्ज झाले आहेत.

आजच्या बैठकीला तालुक्‍यातील शाखाप्रमुख, गण व गटप्रमुख तसेच इच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्जमाफीसह लोकहिताच्या अनेक योजना आणल्या. त्यामुळे जनमत शिवसेनेबरोबर असल्याने शिवसेनेतर्फे ग्रामपंचायतीच्या निवडणूका लढवण्याचे सूतोवाच जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केले.

हेही वाचा - आमदार नीलेश लंकेंचा बिनविरोधचा वारू सुसाट

खासदार सदाशिव लोखंडे यांनी मार्गदर्शन करताना स्थानिक स्वराज्य संस्थांसह नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी विविध निवडणूकांतही सहकार्य करणार असल्याचे सांगितले. 

शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून जनार्दन आहेर यांना काम पाहण्यास सांगितले. ज्येष्ठ नेते साहेबराव नवले यांच्या सहकार्याने कोअर कमिटीची रचना केली. त्यात शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, बाबासाहेब कुटे, गुलाब भोसले, भाऊसाहेब हासे, अशोक सातपुते, शरद थोरात, अमोल कवडे, शीतल हासे, रामभाऊ रहाणे यांचा सामावेश आहे.

भीमा पावसे, ज्ञानेश्वर कांदळकर, एस. पी. रहाणे, राजू सातपुते, अल्पना तांबे, भारत शिंदे, संतोष कुटे, लखन घोरपडे, दीपक साळुंके, संभव लोढा उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रथमेश बेल्हेकर यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena holds meeting for Gram Panchayat elections