पाण्यावरील हक्कासाठी सात नंबर फॉर्म गरजेचा

मनोज जोशी 
Saturday, 28 November 2020

ठाकरे यांनी पत्रकात म्हटले आहे, की आपल्या हक्काचे पाटपाणी भविष्यात कमी होऊ नये व टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी सात नंबर फॉर्म भरावा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.
 

कोपरगाव (अहमदनगर) : शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावरील अधिकार अबाधित ठेवण्यासाठी सात नंबर फॉर्म अत्यंत गरजेचा आहे. तालुक्‍यातील सर्व शेतकऱ्यांनी हा फॉर्म भरताना काही अडचणी आल्यास शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी केले आहे. 

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

ठाकरे यांनी पत्रकात म्हटले आहे, की आपल्या हक्काचे पाटपाणी भविष्यात कमी होऊ नये व टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी सात नंबर फॉर्म भरावा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.
 
लाभक्षेत्रातील सर्व शेतकरी आणि पाणीवापर संस्थांच्या लाभक्षेत्रातील, सभासद नसलेल्या शेतकऱ्यांनीही हा फॉर्म भरणे आवश्‍यक आहे. सध्या पाणी उपलब्ध आहे; मात्र भविष्यातील वाढीव पाण्याची गरज लक्षात घेऊन हक्काचे पाणी सुरक्षित ठेवावे. अडचणी असल्यास शिवसेना पदाधिकारी व पक्षकार्यकर्त्यांशी संपर्क साधल्यास मदत केली जाईल, असे शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी म्हटले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena taluka chief Shivaji Thackeray has appealed to the farmers to contact Shiv Sena office bearers in case of any difficulty while filling up form number seven