दानवेंच्या वादग्रस्त वक्तव्याविरुद्ध शेवगावमध्ये शिवसेनेचे आंदोलन

सचिन सातपुते 
Sunday, 13 December 2020

शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा अजब दाबा केंद्रीय राज्यमंत्री, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ निषेध व्यक्त केला.

शेवगाव (अहमदनगर) : शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा अजब दाबा केंद्रीय राज्यमंत्री, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंबेडकर चौक शेवगावमध्ये शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारुन निषेध व्यक्त केला.

शेवगाव पाथर्डी विधानसभा संपर्क प्रमुख नंदकुमार मोरे व जिल्हा प्रमुख राजेंद्रजी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख अँड. अविनाश मगरे, शिवसेना शहरप्रमुख सिद्धार्थ काटे, युवा सेना तालुका प्रमुख शितल पुरनाळे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव येथे केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात तसेच रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी विधानाबद्दल निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी दानवे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारुन निषेध व्यक्त केला. 

या आंदोलनात माजी शहरप्रमुख सुनिल जगताप, शिवसेना तालुका संघटक महेश पुरनाळे, ता.उप प्रमुख मधुकर कराड, शिक्षक सेना ता. प्रमुख गणेश पोटभरे, उदय गांगुर्डे, युवा सेना शहर प्रमुख महेश मिसाळ, कानिफ कर्डिले, मगरे गौरेश, अशोक गवते, कृष्णा बोंबले, ज्ञानेश्वर धनवडे, योगेश धनवडे, महेश लातूरकर, नवनाथ सुडके, विकास भागवत, अभिजीत ईके, अशोक शिंदे, एकनाथ पोटे, दिलीप साळुंखे, संदीप बोराले, संतोष लांडे, शिवाजी तावरे, कडुबा लोंढे, गोवर्धन भापकर आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena agitation in Shevgaon against Danve controversial statement