Ahmednagar Bio diesel : शिवसेनेच्या शहरप्रमुखपदावरून दिलीप सातपुतेंची उचलबांगडी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dilip satpute
Ahmednagar Bio diesel : शिवसेनेच्या शहरप्रमुखपदावरून दिलीप सातपुतेंची उचलबांगडी?

शिवसेनेच्या शहरप्रमुखपदावरून दिलीप सातपुतेंची उचलबांगडी?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : केडगाव येथील बेकायदेशीर बायोडिझेल विक्री प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्या शहरप्रमुखपदावरून दिलीप सातपुते यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

हेही वाचा: सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावे: सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

केडगाव येथे बेकायदा बायोडिझेल विक्री प्रकरण गाजले. याप्रकरणी तपासात सातपुते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मोठ्या प्रकरणात नाव आल्यानंतर शिवसेनेकडून काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले होते. सातपुते सध्या पसार आहेत. गेल्या दोन दिवसांत शिवसेनेने भूमिका स्पष्ट केली नव्हती. आज मात्र, या पदावरून सातपुतेंची उचलबांगडी केल्याचे समजते.

सातपुते यांच्या कारभाराबद्दल पक्षातच दोन गट आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे तक्रारीही झाल्या आहेत. त्यातच मोठ्या गुन्ह्यात आरोपी म्हणून नाव आल्याने पक्षश्रेष्ठीही त्यांच्यावर नाराज असल्याचे समजते.

हेही वाचा: प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी ST संपकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढा - HC

या गुन्ह्याची व्याप्ती जिल्हाभर आहे. ही बाब पक्षातील विरोधकांनी त्यांच्याबद्दल वरिष्ठांच्या कानावर घातली आहे. त्यातूनच त्यांची हकालपट्टी झाल्याचे समजते. परंतु, याबाबत स्थानिक नेतृत्वाकडे संपर्क साधला असता, तो झाला नाही.

loading image
go to top