

Life-Threatening Assault on Police Squad Sparks Panic in Shrirampur
sakal
श्रीरामपूर : शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकावर एकाने ट्रॅक्टर घालून जीवघेणा हल्ला केल्याची घटना आज (ता. २५) सकाळी कमालपूर शिवारात घडली. या भीषण हल्ल्यात मुख्य पोलिस हवालदार प्रसाद साळवे यांच्या हातावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या मदतीला धावलेला एक नागरिकही जखमी झाला. पोलिसांनी जीवाची बाजी लावून आरोपीला वाळूने भरलेल्या ट्रॉली व ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले आहे.