
अहिल्यानगर: तिघांना बळजबरीने डांबून ठेवून त्यांच्याकडून वेठबिगारी करून घेणाऱ्या दोन आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. जाकिश बबड्या काळे (वय ३५, रा. भोसले आखाडा, बुरुडगाव रोड) व किशोर पोपट चव्हाण (रा. चोकनवाडी, अरणगाव, अहिल्यानगर) अशी या आरोपींची नावे आहेत. आरोपी किशोर चव्हाण हा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून तिघांची सुटका केली आहे.