

Family Dispute Turns Fatal in Shrirampur, Police Probe On
sakal
श्रीरामपूर : शहराजवळील दत्तनगर गावात एका महिलेने पतीची डोक्यात लाकूड घालून व गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. पती दारूच्या नशेत सतत मारहाण करत असे व संशय घेत असे, या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलल्याची कबुली संशयित पत्नीने दिली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.