
अहिल्यानगर: पाथर्डी तालुक्यातील एका शाळेतील मुलीसोबत अश्लिल गैरवर्तनप्रकरणी तेथील उपाध्यापक संजय उत्तम फुंदे निलंबित आहे. तेथील प्रभारी मुख्याध्यापक शीला भगवान बांगर यांना जबाबातील तफावत, तसेच दिशाभूल केल्याचा ठपका ठेवून जिल्हा प्रशासनाने निलंबित केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी ही कारवाई केली.