

Railway Track Death of Naib Tehsildar Raises Serious Questions
sakal
अहिल्यानगर: जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभाग व मुख्यमंत्री सचिवालय कक्ष विभागाचे नायब तहसीलदार किरण रामदास देवतरसे (वय ५८) हे आज सकाळी नऊच्या सुमारास निंबळक परिसरातील रेल्वे रुळावर मृतावस्थेत आढळले. त्यांनी आत्महत्या केली की काही घातपात आहे, याबाबतचा तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत. देवतरसे सहा महिन्यांनी निवृत्त होणार होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.