

Ahilyanagar hospital under scrutiny after tampering found in disability certificate records.
Sakal
अहिल्यानगर: जिल्हा रुग्णालयात १४२ दिव्यांग प्रमाणपत्रांची नोंद एकाच जावक क्रमांकावर झाल्याचे पोलिस तपासात आढळले आहे. तसेच काही प्रमाणपत्रांवर खाडाखोडही आढळली आहे. आता याप्रकरणी रजिस्टर नोंद घेणाऱ्या कर्मचाऱ्याला नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली, तसेच पुनर्पडताळणी प्रक्रिया ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ही पडताळणी काटेकोरपणे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.