
नगर तालुका : अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीसाठी सात विद्यार्थ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून त्यांचा नगर तालुक्यातील एका नामांकित संस्थेत प्रवेश दाखवून शासनाची ३८ हजार ९०० रुपयांची शिष्यवृत्ती लाटल्याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.