
पारनेर : पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा येथे दुचाकीस्वाराला चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नितीन प्रकाश शेळके असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सागर सुरेश धस (रा. आष्टी, ता. आष्टी, जि. बीड) याच्या विरोधात सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर आमदार सुरेश धस यांचा मुलगा आहे.