

Gruesome Killing Shocks Ahilyanagar District
Sakal
अहिल्यानगर : घरात एकटी असलेली व दोन्ही पायांनी अधू असलेल्या ४० वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील बोल्हेगाव उपनगरात घडला. मनीषा बाळासाहेब शिंदे (वय ४०) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली.