
-अलताफ कडकाले
अहिल्यानगर : जिद्दीच्या जोरावर खेळाडू रात्रंदिवस मेहनत घेऊन स्पर्धा गाजवित असतात. पण कधी-कधी ते यासाठी शॉर्टकटचाही अवलंब करतात आणि ‘डोपिंग’ला बळी पडतात. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) डोपिंग चाचणीचा एक अहवाल जाहीर केला आहे. यात सर्वाधिक खेळाडू भारतीय आहेत. हीच परिस्थिती ग्रामीण भागातील खेळाडूंचीही आहे. तळापासूनच खेळाडू ‘डोपिंग’ला बळी पडत असतील, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी परिस्थिती काय असणार ? नकळत तरुण खेळाडू याला बळी पडत आहेत, खेळात करिअर करायचे असेल तर मेहनतही घ्यावीच लागेल अन् अशा गोष्टींपासून दूर राहायला हवे.