

Firefighters inspect the charred remains of seven shops destroyed in the Newasa market blaze.
Sakal
नेवासे शहर: शहरातील नगरपंचायत चौकातील मुख्य बाजारपेठेत बुधवारी रात्री लागलेली आग एक तासाच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात आली. या आगीत सात दुकाने खाक झाली असून, अन्य दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये सर्व व्यावसायिकांचे ४६ लाखांचे नुकसान झाले असून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात म्हटले आहे.