
कोपरगाव: पोहेगाव खुर्द, पोहेगाव बुद्रुक आणि जवळके ही गावे आता कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. या निर्णयामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, विद्यमान आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी याकामी शासनस्तरावर आपणच पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे.