Shrigonda: श्रीगोंद्यात अवकाळीचा पिकांना फटका ! कोट्यवधी रुपये पाण्यात, द्राक्षांसह, कापूस, कांद्याचे नुकसान

श्रीगोंद्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कापूस आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Shrigonda: श्रीगोंद्यात अवकाळीचा पिकांना फटका ! कोट्यवधी रुपये पाण्यात, द्राक्षांसह, कापूस, कांद्याचे नुकसान

Crops affected due to Unseasonal Rains: तालुक्यात गेल्या काही दिवसांत सतत पडणाऱ्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत. यात पारगाव, बेलवंडी, लोणीव्यंकनाथ येथील द्राक्षाचे प्रचंड नुकसान होण्याचा धोका आहे. इतर ठिकाणच्या कांदा, कापूस या काढणीयोग्य पिकांना फटका बसत आहे. सरकारी यंत्रणा पंचनामे करीत असली, तरी पाऊस थांबला नाही तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती आहे.

श्रीगोंदे तालुक्यातील बहुतेक भागात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाची बरसात सुरू आहे. काही ठिकाणच्या पिकांना या पावसाने दिलासा मिळाला असला, तरी अवकाळीने काढणीयोग्य कांदा, कापूस यासोबतच बहर आलेले द्राक्ष, लिंबू, डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील बहुतेक भागात या पावसाची हजेरी आहे. समजलेल्या माहितीनुसार, कोळगाव, पारगाव सुद्रिक, घारगाव, बेलवंडी, लोणीव्यंकनाथ, घोटवी, वडाळी, पिंप्री कोलंदर, उक्कडगाव, येळपणे, चिंभळे, काष्टी, वांगदरी या भागात अवकाळी पावसाचा तडाखा जास्त बसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांनी जीवापाड जपत जोपासलेला शेतीमाल मागील चार दिवसांपासून अचानक आलेल्या अवकाळी पावसाने हिरावून घेतला.

यात प्रामुख्याने कांदा कापूस या पिकांसह द्राक्षबागा फुलोऱ्यात आणि पोंगा अवस्थेत असल्याने द्राक्षमण्यांची मोठ्या प्रमाणात गळ होत आहे. या बागेवर बुरशीजन्य रोग, घड कुज रोग, डावणी रोगांच्या नियंत्रणासाठी महागडी औषधे फवारूनही शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने, मका, कडवळ, कोलमडली आहे. ऊस वाहतूक, तोडणी व वाहतुकीसह साखर कारखान्यावर अनिष्ट परिणाम झाला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.

Shrigonda: श्रीगोंद्यात अवकाळीचा पिकांना फटका ! कोट्यवधी रुपये पाण्यात, द्राक्षांसह, कापूस, कांद्याचे नुकसान
Suhana Sakal Swasthyam 2023 : स्वास्थ्यजागराची नांदी; महोत्सवाला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

पंचनामे झाल्यावर माहिती समोर

तालुक्यात कापूस सहा हजार हेक्टर क्षेत्रावर आहे, तर शंभर हेक्टर क्षेत्रावर गुलाबी कांद्याचे पीक आहे. डाळिंब तीन हजार हेक्टर असून लिंबाच्या बागा पाच हजार हेक्टर आहेत. द्राक्षबागा सुमारे बाराशे हेक्टर असल्याचे सांगत अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे नुकसान झाले असून, पंचनामे झाल्यावर नुकसानीची माहिती समोर येईल.

सततच्या अवकाळी पावसाने समोर आलेल्या माहितीनुसार प्रामुख्याने द्राक्ष, कांदा व कापसाचे नुकसान दिसते. याबाबत कृषी अधिकारी व कामगार तलाठ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्याशी संपर्क साधावा.- हेमंत ढोकले, प्रभारी तहसीलदार, श्रीगोंदे.

सततच्या पावसाने शेतातील काढणीयोग्य व फुलोरा धरलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. संबंधित पिकांचे पंचनामे सुरू केले आहेत-दीपक सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, श्रीगोंदे.

Shrigonda: श्रीगोंद्यात अवकाळीचा पिकांना फटका ! कोट्यवधी रुपये पाण्यात, द्राक्षांसह, कापूस, कांद्याचे नुकसान
मोठी बातमी! दोन वर्षांत तब्बल एक हजाराहून अधिक भ्रूणहत्या; मुख्यमंत्र्यांनी दिले CID चौकशीचे आदेश, सहभागी डॉक्टरची आत्महत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com