esakal | प्रेयसी लग्न करीत नाही म्हणून तिच्या मुलालाच पळवून नेले!
sakal

बोलून बातमी शोधा

 crime news

प्रेयसी लग्न करीत नाही म्हणून तिच्या मुलालाच पळवून नेले!

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : सोशल मीडियात जुळलेली नाती शेवटपर्यंत कडेला जात नाहीत, असं काही जाणकार सांगतात. पूर्वी प्रेयशीचं लग्न झालं की प्रेमाचा सगळा विषयच संपून जायचा. मात्र, हल्ली उलटं होतं. विवाहित महिलेशी किंवा पुरषासोबत प्रेमसंबंध जुळतात. अर्थात याला प्रेम म्हणायचं की नाही, हा समाजशास्त्रज्ञांच्या अखत्यारितील विषय आहे. नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दोघांबाबत झालं त्याला राज्यघटनेच्या भाषेत कायदेभंग म्हणतात. या कायदेभंगामुळेच प्रेमवीर तरूणाला जेलची हवा खावी लागली.

औरंगाबाद येथील एका विवाहितेशी ‘त्या’चे प्रेम जुळले. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. मात्र, नकार मिळाल्याने चिडलेल्या प्रेमवीराने तिच्या सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण केले. श्रीगोंदे पोलिसांनी प्रेमवीरासह अपहृत मुलास ताब्यात घेतले. (Shrigonda youth arrested for kidnapping girlfriend's son)

हेही वाचा: गंगा नदी बनेल रोगाचे उगमस्थान! रोहित पवारांना भीती

या प्रकरणी पोलिसांनी सागर गोरख आळेकर (वय २७, रा. आळेकर मळा, श्रीगोंदे) याला ताब्यात घेत अपहृत मुलाची सुटका केली. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील बजाजनगर भागात राहणाऱ्या एका महिलेशी आरोपी सागरचे प्रेमसंबंध होते.

विवाह करण्यासाठी तो तिच्यावर दबाव टाकत होता. मात्र, ती त्याला नकार देत होती. शेवटी त्याने ‘लग्न कर, नाही तर मुलाला पळवून नेईन,’ असे धमकावले. मात्र तरीही महिला लग्नास तयार न झाल्याने सागर याने तिच्या सहा वर्षां मुलाचे अपहरण केले.

औरंगाबाद पोलिसांनी श्रीगोंदे पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यावरून श्रीगोंदे पोलिसांनी पारगाव फाटा येथे नाकाबंदी केली. मोटारीतून (एमएच- ४२ एएच- ९६५५) जाणाऱ्या सागरला अटक केली, तसेच अपहृत मुलाची सुटका केली.

प्रेयशी लग्नाला टाळाटाळ करते म्हणून तिच्या मुलाची किंवा नवऱ्याची हत्या करणारी प्रकरणंही झाली आहेत. अनैतिक संबंधाचा शेवट नक्कीच वाईट होतो.(Shrigonda youth arrested for kidnapping girlfriend's son)