शहरीबाबूंनो, खेड्यात जमीन खरेदी करताय? त्या अगोदर ही बातमी वाचाच

Shrigonde police have registered a case against eight persons for cheating
Shrigonde police have registered a case against eight persons for cheating

श्रीगोंदे (अहमदनगर) : नगरच्या व्यावसायिकास 1 कोटी 55 लाख 21 हजार 300 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीगोंदे पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, त्यातही 9 एकरांचा व्यवहार ठरला असता, प्रत्यक्षात 20 गुंठ्यांचीच विक्री केली. 

विशाल संपत वाघमारे (रा. कोळगाव), रवी संजय ढवळे (रा. श्रीगोंदे), विश्वजीत रमेश कासार (रा. वाळकी, ता. नगर), सुनील फक्कड आडसरे, इंद्रजित रमेश कासार (रा. वाळकी), कोमल विश्वजीत कासार (रा. वाळकी) यांच्यासह दोन अनोळखींचा आरोपींमध्ये समावेश आहे.

हे ही वाचा : राजकारणात व्यक्तिगत कामांचेच महत्त्व वाढले 
 
याबाबत सूर्यकांत रावसाहेब कोल्हे (रा. नगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी कोल्हे यांची 5 जुलै 2020 रोजी आरोपी विश्वजित कासार याच्याशी वाघोली (पुणे) येथे ओळख झाली. कासार याने कोल्हे यांना फोनवर बागायती जमीन घ्यायची का, असे विचारत घोटवी येथील आनंद शेजवळ यांची 9 एकर जमीन विक्रीसाठी असल्याचे सांगितले. त्यानुसार कोल्हे यांनी घोटवी येथे जाऊन जमिनीची पाहणी केली. त्यानंतर 12 जुलै रोजी 1 कोटी 80 लाख रुपयांना व्यवहार ठरला. व्यवहारापोटी 5 लाख रुपयांचे टोकन व खरेदीसाठी लागणारा खर्च 9 लाख 50 हजार, असे एकूण 14 लाख 50 हजार रुपये कोल्हे यांनी दिले. नंतर 13 जुलै रोजी जमिनीचा खरेदी व्यवहार झाला. त्यावेळी बनावट लोकांना उभे करून त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. त्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालयातील सेवा ठप्प झाल्याने, दुसऱ्या दिवशी (14 जुलै) खरेदी झाली. त्याचा फायदा घेत आरोपींनी कागदपत्रांत बदल केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
खरेदीनंतर कोल्हे यांनी 95 लाख रुपये आरोपी कासार याच्याकडे दिले. उर्वरित रक्कम वेगवेगळ्या खात्यांवरून कासार याच्या खात्यावर वर्ग केली. नोव्हेंबर 2020 मध्ये फिर्यादी कोल्हे यांनी आरोपी कासार याच्याकडे जमिनीच्या कागदपत्रांची मागणी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कोल्हे यांना संशय आल्यावर त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयातून खरेदीखताची नक्कल काढली असता, 9 एकराऐवजी फक्त 20 गुंठे जमिनीची खरेदी अन्‌ तेही बनावट कागदपत्रांच्या आधारे केल्याचे समोर आले. जमीनमालक आनंद शेजवळ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपण जमीनविक्रीच केली नसल्याचे सांगितले. त्यानंतर कोल्हे यांनी पोलिसांत धाव घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com