
Shrigonde police bust road robbery gang; loot worth ₹11 lakh recovered from culprits.
Sakal
अहिल्यानगर: श्रीगोंदे तालुक्यात रस्ता लूट करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींकडून ११ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अनिकेत गोरख उकांडे (वय २६, रा. अकोळनेर, ता. जि. अहिल्यानगर), प्रथमेश शिवनाथ शिंदे (वय २२, रा. शिवाजी चौक, श्रीगोंदे) व विजय शहाजी देशमुख (वय ३०, रा. नळवणे, ता. जुन्नर, जि. पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.